लाहोर – पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू व माजी कसोटीपटू अब्दुल रझाक पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत टीकेचा धनी बनला आहे.
भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा पाकिस्तानी क्रिकेटपटूंमध्ये गुणवत्ता जास्त आहे, असे वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
काही महिन्यांपूर्वी भारताचा नवोदित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बेबी बॉलर असे संबोधल्यामुळे रझाकला टीकेचा सामना करावा लागला होता.
आता पुव्हा एकदा त्याच्यावर ताशेरे ओढले जाऊ लागले आहेत. भारतीय खेळाडूंपेक्षा पाकिस्तानी खेळाडूंमध्ये जास्त गुणवत्ता आहे, असे सांगताना त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांच्यात तुलना होऊ शकत नसल्याचेही सांगितले आहे.