इस्लामाबाद: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवार पासून १७ सप्टेंबरपर्यंत आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.त्यामुळे त्यांच्या विमानाला पाकिस्थानी हवाई हद्दीतून जाऊ दयावे अशी परवानगी पाकिस्तान कडे मागण्यात अली होती. परंतु पाकिस्तानने पुन्हा आपली मुजोरी दाखवली असून, कोविंद ययांच्या विमानाला प्रवेश देण्यास नकार दिला आहे.
कोविंद यांच्या विमानाची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली आहे. तर या निर्णयाशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील सहमत आहेत. काश्मीरमधील तणावपूर्ण स्थितीमुळं हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननं त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी पूर्णपणे बंद केली होती. मार्चमध्ये त्यांनी अंशतः हवाई हद्द खुली केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे.