इस्लामाबाद, – पाकिस्तानातील लष्कर आणि न्यायपालिका ही सर्वात भ्रष्ट व्यवस्था असल्याचा निष्कर्ष “ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल पाकिस्तान’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. आजच प्रसिद्ध करण्यात आलेल्या “नॅशनल करप्शन पर्सेप्शन सर्वे 2021′ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
पाकिस्तानमधील प्रांतीय पातळीवर स्वतःला उत्तरदायी मानण्याची भावना असमाधानकारक असल्याचे निरीक्षण या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आले आहे. पाकिस्तानमधील पोलीस सर्वाधिक भ्रष्ट, न्यायपालिका दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर निविदा आणि कंत्राटदार यंत्रणा आणि चौथ्या क्रमांकावर आरोग्य विभागाचा क्रमांक लागत असल्याचा निष्कर्ष 2011 च्या अहवालात काढला गेला होता.
आता पाकिस्तानातील पोलिसांचा भ्रष्टाचार पहिल्या क्रमांकावर, न्यायपालिका दुसऱ्या क्रमांकावर, निविदा आणि कंत्राट विभागातील भ्रष्टाचार तिसऱ्या क्रमांकावर आहे.