इस्लामाबाद – जगभरातील भ्रष्टाचाराच्या टक्केवारी निर्देशांकात पाकिस्तानच्या क्रमवारीमध्ये आणखीन 16 अंकांची घसरण झाली आहे. आता 180 देशांच्या या क्रमवारीमध्ये पाकिस्तान 140 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने ही माहिती दिली आहे. या ताजा अहवाल म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारसाठी आणखीन एक मोठा हादरा मानला जातो आहे. जगभरातील भ्रष्ट देशांच्या क्रमवारीचा अभ्यास करताना 86 टक्के देशांनी गेल्या 10 वर्षात आपल्या देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी फारच थोडा प्रयत्न केला गेला असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
या क्रमवारीमध्ये शून्य निर्देशांक म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचार समजला जातो. यानुसार 2020 मध्ये पाकिस्तानला 31 अंक प्राप्त झाले होते आणि क्रमवारीमध्ये पाकिस्तानचा क्रमांक 124 वा लागला होता. आता पाकिस्तानची 28 अंकांपर्यंत घसरण झाली आहे. आणि क्रमवारीमध्ये पाकिस्तान 140 व्या क्रमांकावर आला आहे.