पाकिस्तानी महिला पंतप्रधानांना राखी बांधण्यासाठी दिल्लीत दाखल

नवी दिल्ली : रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या सुरक्षेसाठी हातावर राखी बांधून देवाकडे प्रार्थना करते. अशीच एक बहिण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात आली आहे. मागच्या 24 वर्षापुर्वीच ही बहिण भारतात दाखल झाली पण दरवर्षी न चुकता पंतप्रधानांना राखी बांधते. ही खास महिला म्हणजे अहमदाबादच्या कमर जहॉं. मागील 24 वर्षांपासून कमर या मोदींना न चुकता राखी बांधतात. विशेष म्हणजे कमर या मुळच्या पाकिस्तानमधील कराचीच्या असून मागील अनेक वर्षांपासून त्या अहमदाबादमध्ये राहतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कमर यांचे खास नाते आहे. सध्या पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी हे सामान्य कार्यकर्ता असल्यापासून मी त्यांना राखी बांधतेय, असे कमर सांगतात. लोकांसाठी काम करायचे आहे याच उद्देशाने मोदींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची मेहनत, इमानदारी आणि मनापासून काम केल्यानेच मजल दरमजल करत आज ते भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. एक पंतप्रधान माझा भाऊ आहे याहून अधिक आनंदाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही. इतक्‍या प्रतिभावान पंतप्रधानांची बहीण असल्याचा मला गर्व आहे, असेही कमर सांगतात. दरम्यान, यंदा पहिल्यांदा मोदींना राखी बांधणार आणि नंतर लाल किल्ल्यावरील भाषण ऐकणार असल्याची इच्छा देखील त्यांनी बोलून दाखवली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)