पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक

जयपूर -पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला राजस्थानमध्ये पोलिसांनी अटक केली. निबाब खान असे त्याचे नाव आहे. तो जैसलमेरचा रहिवासी आहे.

खान 2015 मध्ये पाकिस्तानला गेला होता. त्यावेळी तो आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील हेराच्या संपर्कात आला. त्या हेराने खानला पंधरवडाभर प्रशिक्षण दिले. हेरगिरी करण्यासाठी आमीष म्हणून खान याला 10 हजार रूपये देण्यात आले.

भारतात परतल्यानंतर त्याने हेरगिरी सुरू केली. भारतीय लष्कराशी संबंधित माहिती तो पाकिस्तानी हेराला सोशल मीडियावरून पुरवत होता. हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून तो पोलिसांच्या रडारवर आला. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून आयएसआयचे नापाक मनसुबे उघड होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.