चीननेही पाकिस्तानला दाखवला ‘इंगा’

कथित मित्र राष्ट्राच्या नागरिकांना थेट प्रवेशबंदीच

बीजिंग – पाकिस्तानला त्याच्याच मित्रांकडून जबर दणके बसत आहेत. आखाती देश, मलेशिया पाठोपाठ आता चीननेही पाकिस्तानला जबर दणका दिला. चीनमध्ये पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तान सरकारच्या विमान कंपनीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनीची चीनला जाणारी सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत.

अमेरिकेने पाकिस्तानपासून चार हात दूर राहून भारताशी मैत्री दृढ करण्याला महत्त्व दिले आहे. सौदी अरेबियासह सर्व आखाती देशांनी पाकिस्तानला नवे कर्ज देणे थांबवून जुन्या कर्जांच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. मलेशियाने एका न्यायालयीन आदेशाचे पालन करत पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनीचे एक विमान जप्त केले. पाठोपाठ चीनने पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तान सरकारच्या विमान कंपनीला प्रवेशबंदी केली.

आधीच पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनीच्या वैमानिकांच्या परवान्यांची चौकशी सुरू आहे. काही देशांनी पीआयएच्या विमानांवर तसेच त्यांच्या वैमानिकांवर बंदी घातली आहे. कर्जाच्या वाढत्या ओझ्याने पाकिस्तानचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे. भरमसाठ महागाई, वस्तूंची टंचाई, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे पाकिस्तानवरील संकटांमध्ये वाढ होत आहे.

परिस्थिती बिकट होत असतानाच आधी मलेशियात पाकिस्तानची प्रतिष्ठी धुळीस मिळाली. जप्तीची कारवाई झाली पाठोपाठ चीन सरकारनेही पाकिस्तानच्या नागरिकांना आणि विमानांना प्रवेशबंदी केली आहे.

चीनमध्ये दाखल झालेल्या दहा पाकिस्तानी नागरिकांना करोनाची लागण झाल्यानंतर जिनपिंग प्रशासनाने कठोर निर्णय घेतला. चीनमध्ये तीन आठवड्यांसाठी पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तान सरकारच्या विमान कंपनीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनीची चीनला जाणारी पुढील तीन आठवड्यांची सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.