भारतीय वैमानिक समजून पाकिस्तानने आपल्याच वैमिनाकीची केली हत्या

नवी दिल्ली – भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर 27 फेब्रुवारीच्या सकाळी भारत आणि पाकिस्तानची लढाऊ विमाने आमने सामने आली होती. यावेळी भारताचे मीग आणि पाकिस्तानचे एफ-16 हे विमान कोसळले होते. दोन्ही विमानातील जवान पॅराशूटच्या सहाय्याने सुखरुप खाली उतरले होते. मात्र, पाकिस्तानने ताब्यात घेतलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सुखरुप भारतात परतले. तर, पाकिस्तानी वैमानिकाला पाकिस्तानी जनतेने भारतीय समजून हल्ला करत ठार केले.

पाकिस्तानी हवाई दलाचे वैमानिक शाहनाज एफ 16 विमानाचे उड्डाण करत होते. भारतीय विमानाने यावेळी एफ 16 विमानाचा वेध घेतला होता. यानंतर शाहनाज यांनी पॅराशूटच्या सहाय्याने पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये उडी घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शाहनाज सुखरुप खाली उतरण्याआधीच जखमी झाले होते. त्यांचा गणवेश फाटला होता. यावेळी तेथील लोकांना हा भारतीय वैमानिक असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शाहनाजचा जागिच मृत्यू झाला. भारतीय वैमानिक अभिनंदन यांनाही पाकिस्तानी जनतेने घेरले होते. मात्र ऐनवेळी पाकिस्तानी लष्कराने तिथे पोहोचून त्यांना आपल्या ताब्यात घेतल्याने त्यांना कोणतीही हाणी झाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.