जालंधर – भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी केलेल्या गोळीबारात एक पाकिस्तानी घुसखोर ठार झाला. ती घटना पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत घडली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेलगत तैनात जवानांसाठी हाय ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. अशात पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात सीमेलगत तैनात असणाऱ्या बीएसएफच्या जवानांनी संशयास्पद हालचाली हेरल्या.
एक व्यक्ती भारतीय हद्दीत घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचे त्यांना आढळले. प्रथम जवानांनी घुसखोराला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून घुसखोर सीमेवरील कुंपणाच्या दिशेने पुढे सरकत राहिला. त्यामुळे घुसखोरीचा डाव हाणून पाडण्याच्या उद्देशातून जवानांनी गोळीबार केला. त्यामध्ये घुसखोर मारला गेला. भारत-पाकिस्तान सीमेचा ५५३ किलोमीटर भाग पंजाबमध्ये आहे.