पाकिस्तानी गोळीबारात जखमी झालेल्या बाळाचा मृत्यू

जम्मू: पाकिस्तानी गोळीबारात जखमी झालेल्या आणि अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाचे सोमवारी रूग्णालयात निधन झाले. ती हृदय हेलावणारी घटना जम्मू-काश्‍मीरच्या पूँच जिल्ह्यात घडली.

पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी शस्त्रसंधीचा भंग करत भारतीय हद्दीत मारा केला. त्यांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत शाहपूर क्षेत्रात असणाऱ्या निवासी भागावर तोफगोळ्यांचा मारा केला. त्या माऱ्यात फातिमा जान ही महिला आणि तिच्या बाळासह तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, बाळाचे प्राण वाचू शकले नाहीत.

बाळाच्या आईची आणि दुसऱ्या नागरिकाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. बाळाच्या निधनामुळे पाकिस्तानी सैनिकांचा नापाक चेहरा समोर आला. त्या माऱ्यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी निवासी भागाबरोबरच भारतीय सीमा ठाण्यांना लक्ष्य केले. त्यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाल्याचे समजते. पाकिस्तानी आगळिकीला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात झालेल्या पाकिस्तानी हानीबाबतची माहिती तातडीने मिळू शकली नाही. पाकिस्तानी सैनिक सातत्याने शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय हद्दीत मारा करतात. त्यांनी 22 जुलैला राजौरी जिल्ह्यात केलेल्या माऱ्यात एक भारतीय जवान शहीद झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.