श्रीनगर – पाकिस्तानी लष्कराने रविवारी जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील रामपुर सेक्टर मध्ये तोफगोळ्यांचा मारा केला. 14 जून रोजी त्यांनी पहाटेपासूनच हा मारा सुरू केल्याची माहित लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली. मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल त्यांनी उरी भागात गोळीबार केला त्यात भारतीय हद्दीतील एक महिला ठार झाली.
या जोरदार माऱ्या मुळे त्या भागात राहणाऱ्या नागरीकांना लष्कराने बांधलेल्या बंकर्स मध्ये हलवण्यात आले होते, इतका पाकचा मारा भेदक होता. तथापि त्याला भारतीय हद्दीतूनही चोख उत्तर दिले जात आहे.