पाकिस्तानी लष्कराचे लढाऊ विमान भारताच्या हद्दीत घुसले

नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेने मंगळवारी पाकिस्तानची सीमारेषा ओलांडत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. भारताने केलेल्या या  हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरक्षा समितीची तातडीची बैठक झाली त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातर्फे एका निवेदनाद्वारे हे आवाहन करण्यात आले होते कि, आता कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची सिद्धता ठेवावी, भारताने पाकिस्तानवर अनावश्‍यक अतिक्रमण केले आहे. त्याला पाकिस्तान उत्तर देईल. पण त्याचे ठिकाण आणि वेळ आम्ही ठरवू.

दरम्यान, आज पाकिस्तानी लष्कराचे लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत भारताच्या हद्दीत घुसले मात्र  भारतीय हवाई दलाने या विमानला तत्काळ पिटाळून लावल्याची माहिती वृत्तसंस्थाने दिली आहे. यावेळी जम्मू कश्मीर येथील 15 ठिकाणी पाकिस्तानने गोळीबार केला. सीमेवरील वाढत्या हालचाली लक्षात घेत जम्मू आणि काश्मीरमधील लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.