आलियाच्या गाण्यावर भडकली पाक अभिनेत्री

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या “प्राडा’ या पंजाबी गाण्यावरून पाकिस्तानी एक्‍ट्रेस मेहविश हयातने बॉलिवूडवर गाणी चोरण्याचा आरोप केला आहे. “प्राडा’ या पंजाबी गाण्याच्या अल्बममधून आलिया भटने म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. मेहविशने ट्‌विटर पोस्टवरून जुनेद जमशेद यांच्या गाण्याची चोरी बॉलीवूडने केली असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानला शिव्या देताना दुसरीकडे पाकिस्तानची गाणी चोरली जात आहेत. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन आणि रॉयल्टी देण्याचेही बॉलीवूड टाळत आहे असे म्हणाली,

“प्राडा’ हे गाणे पाकिस्तानमध्ये रिलीज झालेल्या “गोरे रंग का जमाना’ या गाण्याशी मिळतेजुळते आहे. ट्‌विटरवर पाकिस्तानी युजर्सनी मेहविशचे म्हणणे हायलाईट केले आणि मेहविशच्या दाव्याला दुजोराही दिला. यामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीवर विनाकारण आरोप झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानी मेहविश यापूर्वीही भारतीय एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या विरोधात बोलली होती. काही दिवसांपूर्वी मेहविशने शाहरुख खानच्या “बार्ड ऑइफ ब्लड’ या नेटफ्लिक्‍स वरील शोवरही टीका केली होती. हा प्रोजेक्‍ट म्हणजे आणखीन एक कमकुवत आणि पाकिस्तान विरोधी प्रोजेक्‍ट असल्याचे मेहविश म्हणाली. बॉलिवूड सातत्याने पाकिस्तान विरोधी अजेंडा राबवत असल्याचेही ती म्हणाली. शाहरुख खानने देशभक्त बनावे. मात्र त्यासाठी पाकिस्तानला शिव्या देण्याची काही आवश्‍यकता नसल्याचे ती म्हणाली.

यापूर्वी पाकिस्तानी एक्‍ट्रेस वीणा मलिकनेही भारत विरोधी विषारी ट्‌विट केले होते. भारतीय सेना, शहीद जवान आणि एअर स्ट्राइकच्या विरोधात ट्विट वीणाने केले होते. भारतीय फिल्म इंडस्ट्रीने देशप्रेमावर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले मात्र द्वेषभावना पसरवण्याच्या हेतूने या सिनेमांचा उपयोग केला केला नव्हता. पाकिस्तानमध्ये मात्र अगदी उलट वातावरण आहे. त्याचेच उदाहरण मेहविश आणि वीणा मलिकने दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)