2022 मध्ये पाकिस्तान पहिला आंतरराळवीर अवकाशात पाठवणार

चीनच्या मदतीने पार पाडणार कामगिरी

नवी दिल्ली : भारताने चांद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानने अवकाशाबाबत मोठी घोषणा केली आहे. 2022 पर्यंत पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान पुढील चार वर्षांमध्ये पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार असल्याची माहिती पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे.

अवकाशात अंतराळवीर पाठवण्याच्या पाकिस्तानच्या या पहिल्या महत्वकांशी मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड प्रक्रिया पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होईल अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे. चौधरी यांनी ट्‌विटवरुन या मोहिमेसंदर्भात माहिती दिली आहे. सर्वांना सांगायला अभिमान वाटतोय की अंतराळात पहिला पाकिस्तानी अंतराळवीर पाठवण्यासाठीची निवड प्रक्रिया फेब्रुवारी 2020 ला सुरु होईल. निवड प्रक्रियेमध्ये 50 जणांची निवड केली जाईल. त्यामधून अंतिम 25 जण निवडले जातील. 2022 मध्ये आम्ही आमच्या देशातील पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहोत. देशाच्या अंतराळ संशोधनासंदर्भातील हा सर्वात महत्वाचा क्षण असेल, असे ट्‌विट चौधरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)