पाकिस्तान पुन्हा हल्ला करणार : भाजप नेत्याचा दावा 

नवी दिल्ली – एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहणार आहे. आणि पाकिस्तान आणखी एक हल्ला करणार असल्याचा दावा भाजपचे वरिष्ठ नेते  सुब्रमण्‍यम स्‍वामी यांनी केला आहे.

सुब्रमण्‍यम स्‍वामी यांनी म्हंटले कि, पाकिस्तान आणखी एका हल्ला करणार आहेत. माझ्या अंदाजानुसार २० मार्चनंतर हल्ला होण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानी नागरिक दुखी आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी पाकिस्तान हल्ला नक्की करेल. त्यासाठी आपल्याला तयारीत राहायला हवे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मसूद अजहर बाबतीत मला कोणतीही माहिती मिळाली नाही. मी केवळ राष्ट्रासाठी महत्वाची असणारच माहिती ठेवतो. अजहरचा मृत्यू झाला तर जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटना बंद होणार आहे का? असा सवालही त्यांनी विचारला.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यात पाकपुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’चा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने कारवाई करून तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते. त्यानंतर पाकनेही भारताच्या हद्दीत लढाऊ विमाने घुसवून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.