जम्मू काश्मीरः दिवाळीपूर्वी पाकिस्तानची नापाक हरकत

तीन सेक्टरमध्ये गोळीबार, बीएसएफचा एक जवान शहीद

जम्मू-काश्मीर :- दिवाळीपूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक हकरत केली आहे. उत्सवा दरम्यान वातावरण विस्कळीत करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती मिळत आहे. पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक राकेश डोभाल शहीद झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील तीन सेक्टरमध्ये शुक्रवारी गोळीबार करण्यात आला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमधील इजमार्ग येथे सर्वात प्रथम शस्त्रसंधीचं करण्यात आलं. यानंतर काही मिनिटांनी कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्येही गोळीबार करण्यात आला.

अधिकाऱ्याने सांगितले की, बारामुलाच्या उरी सेक्टरमध्येही पाकिस्तानी लष्करानेही भारतीय चौक्यांवर गोळीबार केला.या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले. भारतीय सेना हल्ला झालेल्या तिन्ही सेक्टर मध्ये चोख प्रत्युत्तर देत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.