पाकच्या गोळीबारात एक जवान शहिद
जम्मू : पाकिस्तानच्या सैन्याने उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून याठिकाणी फायरिंग करण्यात आली असून यात एक भारतीय जवान शहिद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भारतीय सैन्यानेदेखील पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे.
शनिवारी सकाळी माछिल सेक्टरच्या भारतीय चौक्यांवर पाकिस्तानच्या सैन्याने अचानक गोळीबार केला. यात एक जवान गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरआर के लांस नायक राजेंद्र सिंह असे शहिद झालेल्या जवानाचे नाव आहे. दरम्यान, या अगोदर 23 जुलै रोजी पाकिस्तानच्या सैन्याने सीमारेषेजवळ तीन ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.