नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय स्तरावरील निधीच्या अखंडित पुरवठ्यासाठी आवश्यक असणारी अटी पूर्ण करण्यात देश अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तान पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत जागतिक दहशतवादी वित्तपुरवठा करणाऱ्या वॉचडॉगच्या काळ्या यादीत वरच्या स्थानावरच राहील.
यासंदर्भात फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) म्हटले आहे की, पाकिस्तानने 27 पैकी सहा गुणांची अद्याप पूर्तता केलेली नाही. इस्लामाबादने सर्व अटी पूर्ण केल्यावरच एफएटीएफकडून साइटवर भेट दिली जाईल आणि त्यानंतरच पाकिस्तानवरील बंदी मागे घेण्यात येईल. मात्र, त्यासाठी वर्ष 2021 उजाडेल.
पाकिस्तानने 27 पैकी 21 निकष पूर्ण केले आहेत. याचा अर्थ असा आहे की, जग सुरक्षित झाले आहे; परंतु पाकिस्तानने या उर्वरीत सहा उणीवा दुरूस्त करणे आवश्यक आहे. आम्ही त्यांना त्यांची प्रगती सुधारण्याची संधी देतो आणि तसे झाले नाही तर देशाला काळ्या यादीत टाकले जाईल, असे एफएटीएफचे म्हणणे आहे.
दहशतवादी संघटनांचे मोर्च म्हणून काम करणाऱ्य्ा संघटना आणि मौलाना मसूद अझर आणि हाफिज सईद यासारख्या जगाच्या सर्वाधिक दहशतवादी दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करण्यात पाकिस्तान अपयशी ठरले आहे. दहशतवादी कारवायांना आणि त्यासाठी पैशांची उधळपट्टी करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान प्रभावीपणे कारवाई करण्यात अयशस्वी ठरला आणि अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स आणि जर्मनी या चार बलाढ्य देशांनी पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील भूमिकेबद्दल पूर्णपणे असमाधान व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.