‘अभिनंदन’! ची उद्या होणार सुटका : इम्रान खान यांची घोषणा

काल भारत व पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या हवाई कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले होते. पाकिस्तानी विमानांना त्यांच्या हद्दीमध्ये पिटाळताना भारताचे लढाऊ विमान मिग २१ वैमानिकासह बेपत्ता झाले होते. यानंतर भारताचे हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन नामक भारतीय वैमानिकाला आपल्या ताब्यात घेतले होते. दरम्यान पाकिस्ताननी पंतप्रधानांनी आज पाकिस्तानच्या संसदेमध्ये आपण भारतीय वैमानिकाला भारताकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती दिली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन नामक या भारतीय वायुसेनेच्या वैमानिकास भारत-पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने भारताच्या हवाली करणार असल्याचे पाकिस्तानच्या संसदेमध्ये म्हंटले आहे. तत्पूर्वी भारताचा वैमानिक पाकिस्तानच्या हाती लागल्याचे वृत्त येताच भारतीय परराष्ट्र विभागाने पाकिस्तानला या वैमानिकाच्या सुरक्षिततेबाबत परखड शब्दांमध्ये चेतावणी दिली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या चेतावणी नंतर पाकिस्तानने भारतीय वैमानिकाची सुटका करण्याचा निर्णय घेतला असल्याने याला भारताच्या कूटनीतीचा मोठा विजय मनाला जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.