लाहोर – पाकिस्तान व श्रीलंका यांच्यात होणार असलेली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे देशात केवळ घरगुती वापरासाठीच केवळ 12 तास विज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्यांसाठी विज पुरवठा उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. मात्र, या दोन संघात कसोटी मालिका खेळवली जाणार असल्याचे श्रीलंका व पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सांगितले.
ही मालिका आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी या एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, इंधन तुटवड्यामुळे विज पुरवणे शक्य नसल्याने ही मालिका रद्द करण्यात आली आहे.