पाकिस्तानने दहशतवादावरील कारवाईसाठी आक्रमक व्हावे

अमेरिकेने सुनावले पाकला खडेबोल

वॉशिंग्टनः भारताने जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून हा मुद्दा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जाण्याच्या विचारात आहे. त्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेशी संपर्क केला असता पाकलाच तोंडघशी पडावे लागले आहे. कारण अमेरिकेने पाकिस्तानला भारतावर कारवाई करण्याचा विचार न करता दहशतवादाच्या विरोधात कारवाई करावी असे खडसावले आहे.

भारताने जम्मू काश्‍मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता अमेरिकेतल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या दोन प्रभावशाली खासदारांनी पाकिस्तानला भारताविरोधात कोणतीही कारवाई करण्याचा विचार करू नका, असा इशारा दिला आहे. तत्पूर्वी पाकिस्तानने भारतासोबतचा राजकीय संबंधांचा दर्जा कमी केला आहे. यानंतर आता पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.