नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स दौऱ्यावर आहेत. त्यांचे फ्रान्समध्ये भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान, पॅरिस विमानतळावर गुजरातमधील दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाने पंतप्रधान मोदींचे तिरंगा फडकवत स्वागत केले. यावेळी भारतीयांनी भारत माता की जयच्या घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला. या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला. मात्र भारताच्या पंतप्रधानांचे मुस्लीम समाजाने केलेल्या या स्वागताने पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाल्याचे दिसत आहे.
Warm welcome, warm conversations.
A glimpse of how Indians based in France welcomed PM @narendramodi. pic.twitter.com/IDWijoNfoD
— PMO India (@PMOIndia) August 22, 2019
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये फ्रान्समधील भारतीय मुस्लीम मोदींशी हस्तांदोलन करुन त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. त्यापैकी एका व्यक्तीने मोदींना तिरंगा झेंडा घेऊन त्यांचे स्वागत केल्याचेही व्हिडिओत दिसते.
Kitnay paisey lag gaye iss dramay pe? https://t.co/6ZeSIRNDnA
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) August 22, 2019
पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या सरकारमध्ये माहिती मंत्री असणाऱ्या फवाद चौधरी यांनी पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ रिट्विट करताना कोट करुन या नाटकासाठी किती पैसे खर्च केले? असे ट्विट केले आहे. दरम्यान, फवाद यांच्या या ट्विटमुळे भारतीय युझर्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.