पाकने प्रवास बंदीच्या यादीतून 5 हजार जणांना वगळले

इस्लामाबाद – विदेश प्रवासाची परवानगी नाकारलेल्या व्यक्‍तींच्या यादीतून पाकिस्तानने सुमारे 5 हजार जणांना आज वगळले. या यादीतील व्यक्‍तींना परदेशी जाता येत नसल्यामुळे होत असलेल्या अडचणींचा आढावा घेतल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला, असे आज प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.

गृहमंत्री इजाझ शाह यांनी अलिकडेच घेतलेल्या बैठकीमध्ये “ब्लॅक लिस्ट’मधील व्यक्‍तींवरील प्रवास बंदीचा आढाआ घेतला. दर दोन वर्षांनी होणारी ही बैठक तब्बल चार वर्षांनंतर झाली.

या काळ्या यादीमध्ये प्रामुख्याने दहशतवाद, मनी लॉन्डरिंग सारख्या गंभीर गुन्ह्यांबरोबरच देशविरोधी कारवायांचे आरोप असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला असतो. त्याशिवाय अन्य देशांमधून मायदेशी प्रत्यार्पण केलेल्या व्यक्‍ती, बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशात गेलेले आणि विदेशातल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे सिद्ध झालेल्या व्यक्‍तींनाही परदेश प्रवासास बंदी घालण्यात येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.