पाकिस्तानात पाच जणांनी बकरीवर केले अत्याचार, पंतप्रधान इम्रान खान ट्रोल

लाहोर – पाकिस्तानामध्ये एका बकरीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानच्या ओकारामध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपींनी बकरीचा अत्याचार केल्यावर तिची हत्या केली आहे. अत्याचाराच्या या घटनेनंतर सोशल मीडियावर युझर्सनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ट्रोल केले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या घटनेनंतर आरोपींनी पळ काढला आहे. पाकिस्तानात या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान या घटनेवरुन बकरीने सुद्धा पेहरावामध्ये सभ्यता पाळायला पाहिजे होती का? असा सवाल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एकाने विचारला आहे. पाक अभिनेत्री माथिराने इन्स्टाग्रामवर बकरीच्या अत्याचाराची बातमी शेअर केलीय व बकरीला सुद्धा संपूर्ण अंग झाकणारे कपडे घालायला पाहिजे होते का? असा सवाल केला आहे.

नेकेड प्राणी पाहिल्यानंतर माणसांवर परिणाम होतो का? असा सवाल एका युझरने विचारला आहे. तर हँडसम पंतप्रधान बकरीला पूर्ण अंग झाकून घ्यायला सांगतील, असे एक युझर म्हणाला आहे. एका वृत्तवाहिनेने हे वृत्त दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.