लाहोर – लाहोरमधील राष्ट्रीय उत्तरदायित्व न्यायाधिककरणाने आज पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांचे पुत्र सुलेमान शेहबाझ यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणी हंगामी जामीन मंजूर केला. सुलेमान यांनी तपासामध्ये सहबागी व्हावे, असे निर्देश देखील न्यायालयाने दिले.
आपल्याला फरार गोषित करण्यापूर्वी न्यायालयाने कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे सुलेमान यांनी आपल्या जामिनासाठीच्या अर्जामध्ये म्हटले होते. आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसताना फरार घोषित करण्यात आले आहे. न्यायालयाने मागितलेले कॉम्प्युटराईज्ड नॅसनल आयडेंटिटी कार्ड आपल्याकडे उपलब्ध नसून पुढील सुनावणीला आपण ते उपलब्ध करू, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सुलेमान यांना 7 जानेवारीपर्यंतचा हंगामी जामीन मंजूर केला.
सुलेमान शेहबाझ यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंगचे प्रकरण सुरू असून ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंग आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावण्यात आले होते, असेही न्यायालयाला यावेळी सांगण्यात आले.