लाहोर – पाकिस्तानात पोलिओ लस पथकावर अंदाधुंद गोळीबारकरण्यात आला आहे. करक शहराजवळ पोलिओ लस पथकावर हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात टोळक्याच्या हल्ल्यात जुनैदुल्लाह नावाच्या पोलिसाचा मृत्यू झाला आहे.
हा हल्ला सकाळी करण्यात आला.
कॉन्स्टेबल जुनैदुल्लाह लातूंबर भागात पोलिओ सुरक्षा कर्तव्यावर होता. हल्लेखोर मोटारसायकलवर आले आणि त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि पोलिओ लसीकरण दल व्हॅनमध्ये होते. त्यामुळे ते थोड्क्यात बचावले. या हल्ल्यात दुसऱ्या कोणालाही दुखापत झाली नाही आणि परिसरात पोलिओ लसीकरण मोहीम अजूनही सुरू आहे.
गतवर्षी, करक आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतातील 15 पोलिओचे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे येथे पोलिओ लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र, काहींचा याला विरोध आहे. दरम्यान, 11 जानेवारी 2021 पासून कराची येथे डोर-टू-डोर पोलिओ लसीकरण मोहीम सुरु आहे.