Pakistan Petrol-Diesel Price : पाकिस्तानातील (Pakistan)महागाईने चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बेलाआऊट योजनेअंतर्गत पाकिस्तानला ३ डॉलर अब्जची मदत केल्यानंतर काही अटी घातल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा महागाई वाढली असल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तान(Pakistan) दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता त्यावेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ३ अब्ज डॉलरची मदत करून देशाला दिवाळखोरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यावेळी आयएमएफने पाकिस्तानला काही अटी शर्थीही लावल्या. त्यानुसार, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्याचीही अट होती. त्यामुळे सरकारने सातत्याने इंधन दरांत वाढ केली. यामुळे महागाईच्या दरांतही वाढ झाली.
पाकिस्तानचा (Pakistan)महागाई दर मे महिन्यात ३८ टक्के होता. मे महिन्यांनंतर चार महिन्यांनी सप्टेंबरचा महागाई दर ३१.४ झाला आहे. ऑगस्टमध्ये हाच दर २७.४ टक्के होता. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
पाकिस्तानच्या(Pakistan)काळजीवाहू सरकारने इंधनाच्या किमती वाढवल्या आहेत. त्यासोबतच, जुलैमध्ये सुरू झालेला बेलआउट कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी आयएमएफच्या अटींचा भाग म्हणून गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे पाकिस्तानात उदरनिर्वाहाचा खर्च वाढला आहे.
इंधन दरांत ३१.२६ टक्क्यांनी, तर, खाद्यपदार्थांच्या किमतीत ३३.११ टक्क्यांनी वर्षभरात भरघोस वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तसंच, घर, पाणी आणि विजेच्या किमतीत २९.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये (Pakistan)महागाईचा भडका उडाला आहे.