इस्लामाबाद – पाकिस्तानातील लाहोरच्या किल्ल्यात खोदकामादरम्यान 400 वर्षे जुने भूयार आढळून आले आहे. भूयार इतके जुने असूनही पूर्णपणे सुरक्षित आहे.
लाहोरच्या किल्ल्यात 21 स्मारके आहेत ज्यातील काही सम्राट अकबराच्या काळातील आहेत. काही काळापूर्वी या किल्ल्यात दुरुस्ती आणि डागडुजीचे काम सुरू होते जेव्हा हे भुयार सापडले. या भुयाराची मजबुती आधीसारखीच आहे. हे पूर्णपणे हवेशीर आहे आणि प्रकाश व्यवस्थित आतपर्यंत पोहोचण्याचीही व्यवस्था आहे.
भूयाराच्या आतून अनेक गुप्त मार्गही आहेत. असेही म्हटले जात आहे की या भूयाराचा वापर नुकताच गुप्त मार्ग आणि पाणी बाहेर काढण्यासाठी केला गेला होता.
लाहोरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या भुयाराच्या भिंती मजबूत आहेत. डब्ल्यूसीएलएचे उपअभियंता हाफिज उमरन जे या प्रकल्पावर काम करत होते त्यांनी सांगितले आहे की काही काळापूर्वी जेव्हा मोती मशीद आणि मकतब खानाच्या पुनर्वसनाचे आणि नूतनीकरणाचे कार्य चालू होते तेव्हा खोदकामादरम्यान भुयाराचे अवशेष आढळले होते.
प्राचीन जलमार्गातून पाणी काढण्यासाठी आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी 625 फुटांच्या या भुयारांची डागडुजी करण्यात आली होती.