Pakistan News – पाकिस्तानमध्ये रा,ट्रध्वज विक्री करणाऱ्या दुकानावर हातबॉम्ब फेकला गेल्यामुळे एक जण ठार झाला आहे. बलुचिस्तान प्रांतात झालेल्या या हल्ल्यात किमान ६ जण जखमी देखील झाले आहेत.
पाकिस्तानचा ७७ वा स्वातंत्र्य दिवस उद्या (बुधवारी) आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्याच दिवशी राष्ट्रध्वज विक्रीच्या दुकारनावर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही गटाने किंवा दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
या स्फोटानंतर सहा जखमी लोक आणि एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला असल्याचे सरकारी रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
बलुचिस्तानमधील फुटीरतावादी गटाने दुकान मालकांना पाकिस्तानचे राष्ट्रीय ध्वज विकू नयेत असे सांगितल्यानंतर काही दिवसांनी हा हल्ला झाला.
बलुच लिबरेशन आर्मीने लोकांना गुरुवारी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानला १४ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.
मात्र बलुच बंडखोरांनी हा दिवस बलुचिस्तानला पारतंत्र्यात टाकल्याचा दिवस असल्याचे म्हटले आहे. बलुच फुटीरतावादी गट दीर्घकाळापासून पाकिस्तान सरकारकडून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत.
बलुचिस्तानची मोठी सीमा शेजारील अफगाणिस्तानला लागून आहे. पाकिस्तानी तालिबान आणि इतर अतिरेकी गट अनेकदा सुरक्षा दलांवर सीमेपलीकडून हल्ले करत असतात. असा हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैनिक मारले जात असतात.