#ICCWorldCup2019 : भारताचे पाकिस्तानसमोर 337 धावांचे लक्ष्य

मॅंचेस्टर – सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या शतकी तर विराट कोहली आणि के.एल. राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 337 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्ताननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 5 बाद 336 धावापर्यंत मजल मारली.

रोहित आणि केएल राहुलनं संयमी सुरुवात केल्यानंतर राहुल अर्धशतकी खेळी करून बाद झाला. पहिल्या विकेटसाठी रोहित आणि राहुलनं 136 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 57 धावा करत बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहितने 98 धावांची भागिदारी करत भारताची धावसंख्या 234 वर नेली. रोहित शर्मा 113 चेंडूत 140 धावा काढून माघारी परतला. त्याला हसन अलीने झेलबाद केले.

रोहितने 85 चेंडूत 100 धावा करत शतक पूर्ण केलं. रोहित शर्माचं विश्वचषक2019 स्पर्धेतील दुसर तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 24 वे शतक ठरलं. रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे, ज्यानं पाकिस्तान विरोधात सलग शतकी खेळी केली आहे. याआधी आशिया चषक 2018मध्ये रोहितनं 111 धावांची खेळी केली होती.

 

त्यानंतर विराट कोहली 77 , हार्दिक पांड्या 26 तर एम.एस.धोनी 1 धावांवर बाद झाल्याने भारताच्या धावांची गती रोखण्यात पाकिस्तानला यश आले. विजय शकंर 15 आणि केदार जाधव 9 धावांवर नाबाद राहिले.

पाकिस्तानकडून फलंदाजीत मोहम्मद आमिरने 10 षटकांत 47 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर हसन अली आणि वहाब रियाज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)