मुलींच्या तस्करीत पाकिस्तान आघाडीवर

इस्लामाबाद – गरीब पाकिस्तानी मुलींचे चीनी नागरीकांशी विवाह केल्याचे दाखवून त्यांची चीनमध्ये तस्करी होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात दिसून आले आहे. पाकमधील तपास यंत्रणांनी अशा 629 मुलींची सूची तयार केली आहे. मात्र चीनला खूष ठेवण्यासाठी पाक सरकार तपास यंत्रणांवर चौकशी बंद करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप होत आहे.

चीनने पाकिस्तानला मोठी आर्थिक मदत केली असल्याने पाक सरकार अशा प्रकारांकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप केला जातो. पोलीसांनी केलेल्या चौकशीचे अहवाल प्रसिद्ध करण्यावर सरकार बंदी घालते. प्रसारमाध्यमांवरही अशी प्रकरणे उघडकीस न आणण्यासाठी दबाव टाकला जातो. त्यामुळे मोठया प्रमाणात हे प्रकार घडत असूनही फारच थोडी प्रकरणे उजेडात येतात असे अनेक तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वर्ष 2018 पासून आतापर्यंत शेकडो गरीब मुलींचे विवाह चीनी नागरीकांशी लावून देण्यात आले आहेत. या मुलींना विवाहानंतर चीनमध्ये नेले जाते व त्यांच्यावर अत्याचार केले जातात. तसेच अनेकींना वेश्‍या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात. या मुलींच्या पालकांनी अशा असंख्य तक्रारी सादर केल्या आहेत.

मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे काही पाक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एका मुलीमागे चीनी नागरीकाकडून 20 लाख पाकिस्तानी रूपये घेतले जातात. मात्र मुलीच्या पालकांना केवळ 2 लाख रूपये दिले जातात, असे तपासात आढळले. हा अत्यंत फायदेशीर धंदा असल्याने अनेक दलाल यात शिरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.