Pakistan Hindu Girl Died । भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमधील इस्लामकोट थारपारकर याठिकाणी देऊल बाबुहर हिंगोर्जा गावचाय काठावर हिंदू अल्पवयीन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. रिपोर्टनुसार, हेमा आणि वेंटी या मृत मुलांची नावे असुन असून त्यांचे वय 15 ते 17 वर्षांच्या दरम्यान आहे. घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे .
पोलीस अधिका-यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांना सांगितले की, मुली शेतात कामाला गेल्या होत्या तर इतर घरातील कामात व्यस्त होत्या. त्यांनी सांगितले की, अर्ध्या तासानंतर त्यांना माहिती मिळाली की बहिणी झाडाला लटकलेल्या दिसल्या.
दोन्ही बहिणींना मानसिक त्रास Pakistan Hindu Girl Died ।
दोन्ही बहिणींना मानसिक त्रास असल्याचे पालकांनी पोलिसांना सांगितले. त्यांची तिसरी बहीणही चार वर्षांपूर्वी आत्महत्या करून मरण पावली होती, असे गावकऱ्यांनी स्थानिक पत्रकारांना सांगितले की, हे कुटुंब गावाच्या मुख्य वस्तीपासून दूर राहत होते. कुटुंबासोबत कोणतेही वाद किंवा समस्या त्याला माहीत नाव्ह्या.
पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचारPakistan Hindu Girl Died ।
व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटीच्या अहवालानुसार, 2023 च्या पहिल्या दोन महिन्यांत पाकिस्तानमधील प्रादेशिक वृत्तवाहिन्यांवर हिंदूंवरील अत्याचाराची किमान 42 प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये अपहरण, सामूहिक बलात्कार, जबरदस्तीने धर्मांतर आणि मॉब लिंचिंग या घटनांचा समावेश आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात धर्मांतर आणि विवाहाची सहा प्रकरणे नोंदवली गेली होती, तर फेब्रुवारीमध्ये अशी पाच प्रकरणे नोंदवली गेली होती. यापैकी किमान नऊ प्रकरणे नमूद आहेत ज्यात हिंदू पीडितांचे मृतदेह लटकलेले आढळले आणि किमान चार खुनाच्या घटना आहेत.