#CWC19 : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

लंडन – इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर उपांत्य फेरी गाठणे हे पाकिस्तानसाठी स्वप्नरंजनच झाले आहे. आज अखेरच्या लढतीत त्यांना बांगलादेशसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध सामोरे जावे लागणार आहे. अशक्‍यप्राय विजय मिळविला तरच त्यांना बाद फेरीची संधी आहे. बांगलादेशची येथील कामगिरी पाहता हा चमत्कार घडणे अशक्‍यच आहे. त्यामुळेच साखळी गटातच आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की पाकवर येणार आहे.

विश्वचषकातील पाकिस्तान विरूध्द बांगलादेश या सामन्यास काही वेळातच लंडन येथील लाॅर्डस मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूनं लागला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

 

प्रतिस्पर्धी संघ –

पाकिस्तान – इमाम-उल-हक, फ़ख़र ज़मान, बाबर आज़म, मोहम्मद हफीज़, हारिस सोहैल, सरफ़राज़ अहमद, इमाद वसीम, शादाब ख़ान, वहाब रियाज, शाहीन अफ़रीदी, मोहम्मद आमिर

बांगलादेश – तमीम इक़बाल, सौम्य सरकार, शाकिब अल हसन, मुशफ़िकुर रहीम, लिटन दास, महमूदुल्लाह, मोसद्दक हुसैन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहंदी हसन, मशरफे मोर्तज़ा, मुस्तफ़िज़ुर रहमान

Leave A Reply

Your email address will not be published.