जम्मू – पाकिस्तानी जवानांनी सीमेलगतच्या भारतीय हद्दीतील खेड्यांवर तोफगोळ्यांचा मारा केला. पुंछ आणि कठुआ या जिल्ह्यातील खेड्यांच्या दिशेने त्यांनी काल रात्री हा गोळीबार केला. रात्री अडीच वाजण्याच्या सुमाराला हिरानगर भागात गोळीबार करून त्यांनी हे हल्ले सुरू केले.
रात्रभर हे हल्ले सुरू होते असे संबंधीत सूत्रांनी सांगितले. या गोळीबारात भारतीय हद्दीतील कोणी ठार वा जखमी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानी जवानांच्या या गोळीबाराला भारतीय बाजूकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
त्यातुन सुरू झालेली चकमक पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती अशी माहिती एका लष्करी अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे सीमेवरील गांवात राहणाऱ्या नागरीकांमध्ये घबराट पसरली होती व त्यांना सुरक्षेसाठी बंकर्समध्ये आश्रय घ्यावा लागला होता.