पाकिस्तानमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण, ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल…

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. मतदानादरम्यान बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथे बॉम्बस्फोट झाल्याने मतदानास गालबोट लागले. मानवी बॉम्ब द्वारे घडवून आणलेल्या या घटने मध्ये आत्तापर्यंत  ३२ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त देखील मिळत आहे.

 

दरम्यान पाकिस्तान निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एकूण नॅशनल असेंब्लीच्या २७२ जागांसाठी ३४५९ उमेदवार रिंगणात उतरले होते, तसेच चार प्रांतिक असेंब्लीच्या ५७७ जागांसाठी ८३९६ उमेदवारांनी निवडणूक लढवली. सर्व उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदार पेट्यांमध्ये बंदिस्त झाले आहे. निवडणूका संपल्यानंतर २४ तासांमध्ये निकाल लावणार असल्याचे पाकिस्तान निवडणूक आयोगाने या अगोदरच जाहीर केले असल्यामुळे उद्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)