Pakistan Election Results। पाकिस्तानच्या निवडणुकांचे निकाल काही प्रमाणात समोर आले आहेत. मात्र या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक चकमकी पाहायला मिळाल्या. काही लोकांनी मतदान साहित्य हिसकावून त्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. लोकांच्या या समस्यांची दखल घेत पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश दिले आहेत.
देशात ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असतानाच पुन्हा देशात मतदानाची तयारी सुरू आहे. सर्वोच्च निवडणूक समितीने १५ फेब्रुवारीला अनेक मतदान केंद्रांवर फेरमतदानाची घोषणा केलीय. ज्या मतदान केंद्रांवर पुनर्मतदान केले जाईल त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-
हेही वाचा
पाकिस्तानच्या निवडणुकीत सावळा गोंधळ !
NA-88 खुशाब-II (पंजाब) Pakistan Election Results।
मतदानादरम्यान त्याठिकाणचा जमाव चांगलाच संतप्त झाला. त्यानंतर मतदान साहित्य जाळल्याची बातमी समोर आली. आता हे प्रकरण शांत झाल्याने 26 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे.
PS-18 घोटकी-1 (सिंध)
८ फेब्रुवारी रोजी येथे मतदानादरम्यान काही जणांनी मतदानाचे साहित्य हिसकावून घेतल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने 2 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
PK-90 कोहाट-I (खैबर पख्तूनख्वा)
निवडणुकीदरम्यान काही दहशतवाद्यांनी मतदान सामग्रीचे नुकसान केल्याने या मतदारसंघातील 25 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले. या सर्व प्रकरणांमध्ये, सर्वोच्च निवडणूक आयोगाने प्रादेशिक निवडणूक आयुक्तांना NA-242 कराची केमारी-1 (सिंध) मधील 1 मतदान केंद्रावर तोडफोड झाल्याची तक्रार मिळाली. त्यानंतर 3 दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा
76 वर्षे, 24 PM.. मात्र एकालाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.. ‘जाणून घ्या’ पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाला का लागलय ग्रहण
निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न Pakistan Election Results।
अंतिम निकालाच्या विलंबाने पाकिस्तानातील प्रत्येकजण नाराज आहे. निकाल वेळेवर येत नसल्याने अनेक पक्ष निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. निकालात हेराफेरी होत असल्याचा संशय त्यांना असल्याचे म्हटले.