लाहोर – पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) एका वरीष्ठ अधिकार्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पीसीबीने लाहोर येथील आपले मुख्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पीसीबीने आपला अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या इतर कर्मचार्यांना घरी बसून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
📰: HBL PSL 6: Independent fact-finding panel namedhttps://t.co/BEonTX3WPX#HBLPSL6
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 7, 2021
तत्पूर्वी पाकिस्तान प्रीमियर लीग मध्ये सहा क्रिकेटपटू आणि एक सहायक स्टाफ मेंबर कोविड – 19 पॉझिटिव्ह आल्यानंतर पाकिस्तान सुपर लीग स्थगित करण्याचा आदेश द्यावे लागले होते. ज्यानंतर आता हे प्रकरण समोर आले आहे. लीग स्थगित केल्यानंतर बोर्डाला हॉटेलमध्ये आणि संघासाठी स्टेडियममध्ये बायो बबल वातावरणात प्रोटोकॉल लागू करण्याच्या पद्धतीवर पीसीबी टीकेला सामोरे जावे लागले होते.