लाहोर : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर खोटे आरोप केले आहेत. यावेळी पुन्हा भारताच्या आणखी एका गुप्तहेरास अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून एका इसमास अटक केली असून तो पाकिस्तानमध्ये तो हेरगिरी करत होता असा दावा पाकिस्तानने केला आहे. राजू लक्ष्मण असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
लाहोरपासून जवळच असणाऱ्या डेरा गाजी खान भागातून या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. तसेच या व्यक्तीने आपण भारताचा गुप्तहेर असल्याची कबुली दिली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. राजू लक्ष्मण हा भारताचा रहिवासी असून बलुचिस्तानच्या डेरा गाजी खानमधून तो पाकिस्तानमध्ये प्रवेश करत होता त्यावेळी पाकिस्तानच्या पोलिसांनी त्याला अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राजुला पाकिस्तानच्या पोलिसांनी अज्ञात ठिकाणी ठेवले आहे ज्याची कोणालाही माहिती नाही. दरम्यान, कुलभूषण जाधव यांनादेखील कथित हेर असल्याचा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली होती.