कराची – पाकिस्तानचा कर्णधार व सलामीवीर फलंदाज बाबर आझम व महंमद रिझवान यांनी सलामीसाठी द्विशतकी अखंडीत भागीदारी केली व टी-20 क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने मायदेशात इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली.
Utter domination 💪
Pakistan bounce back in the T20I series with a comprehensive 10-wicket win over England.#PAKvENG | 📝Scorecard: https://t.co/WHBPS7jrZE pic.twitter.com/2eNgGw4Q6J
— ICC (@ICC) September 22, 2022
सात सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. दुसरा सामना जिंकत पाकिस्तानने आपले आव्हान कायम राखले. इंग्लंडने 5 बाद 199 धावा करत पाकसमोर विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बाबरने नाबाद 110 धावांची अफलातून शतकी खेळी व रिझवानने दमदार नाबाद 88 धावा करत एकही गडी न गमावता हा सामना जिंकला.
कोहलीला मागे टाकले
या खेळीच्या जोरावर बाबरने टी-20 क्रिकेटमध्ये 8 हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने 218 डावात ही कामगिरी केली. याबाबत बाबरने भारताच्या विराट कोहलीला मागे टाकले.कोहलीने यासाठी 243 डाव खेळले होते. याबाबत अव्वल स्थानावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल असून त्याने 213 डावात 8 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
या विजयासह कर्णधार बाबर व रिझवान यांनी एक नवा विक्रम साकार केला. बाबरने टी-20 क्रिकेटमधील दुसरे शतक पूर्ण केले. त्याने 66 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह 110 धावा केल्या. तर रिझवानने 51 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सहाव्यांदा सलामीच्या जोडीने 200 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली आहे.या दोघांनी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 197 धावांची भागिदारी केली होती. आता त्यांनी धावांचा पाठलाग करताना सलामीच्या जोडीसाठीची सर्वोच्च भागिदारी करण्याचा विक्रम देखील केला. बाबर-रिझवान जोडीने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि मार्टिन गुप्टिल यांचा विक्रम मागे टाकला. या दोघांनी नाबाद 171 धावा केल्या होत्या.