#CWC19 : पाकिस्तानचा महत्त्वपूर्ण विजय; आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात

लंडन – दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज महत्त्वाच्या सामन्यात सपशेल नांगी टाकतात याचाच प्रत्यय दाखवित त्यांनी पाकिस्तानविरुद्ध निर्णायक लढतीत धावांनी पराभव ओढवून घेतला. या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले तर पाकिस्तानने या विजयामुळे उपांत्य फेरीसाठी आपले आव्हान राखले. पाकिस्तानने 50 षटकात 7 बाद 308 धावा केल्या. त्यास उत्तर देताना आफ्रिकेला 50 षटकात 9 बाद 259 धावांपर्यंत मजल गाठता आली.

हशीम अमला याची विकेट लवकर गमाविल्यानंतर क्विन्टॉन डिकॉक व फाफ ड्युप्लेसिस यांनी 87 धावांची भागीदारी केली. डिकॉक याने 3 चौकार व 2 षटकारांसह 47 धावा केल्या. ड्युप्लेसिस याने 63 धावा करताना 5 चौकार मारले. रसी व्हॅनडर दुसे (36) व अँडिले फेलुकवायो (नाबाद 46) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली.

पाकच्या फखर झमान व इमाम उल हक यांनी 81 धावांचा पाया रचला. त्यांनी प्रत्येकी 44 धावा केल्या. बाबर आझम याने मोहम्मद हफीझ (20) याच्या साथीत 49 धावांची भागीदारी केली. आझम व हॅरिस सोहेल यांनी 81 धावा जमविल्या. आझम याने 7 चौकारांसह 69 धावा केल्या. सोहेल याने 9 चौकार व 3 षटकारांसह 89 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक-

पाकिस्तान : 50 षटकांत 7 बाद 308 (फखर झमान 44, इमाम उल हक 44, बाबर आझम 69, हॅरिस सोहेल 89, लुंगी एन्गिडी 3-64, इम्रान ताहीर 2-41)

दक्षिण आफ्रिका : 50 षटकात 9 बाद 259 (डीकॉक 47, फाफ ड्युप्लेसिस 63, रसी व्हॅनडर दुसे 36,अँडिले फेलुकवायो नाबाद 46, मोहम्मद अमीर 2-49, वहाब रियाज 3-46, शदाब खान 3-50,

Leave A Reply

Your email address will not be published.