इस्लामाबाद – पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर बलुचिस्तानात कोसळले असून या दुर्घटनेत किमान 6 जण ठार झाले आहेत. सोमवारी रात्रीपासून हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. बलुचिस्तानातील लासबेला जिल्ह्यातील मुसा गोठ येथे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे आढळून आले आहे, असे लष्कराच्या माध्यम विभागाने म्हटले आहे.
हा अपघात खराब हवामानामुळे झाला असण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टरमधील सर्व 6 जण या उपगातात टार झाले आहेत. मृतांमध्ये ले.जन. सरफराज अली यांचाही समावेश आहे. बलुचिस्तान प्रांतात आलेल्या पूराच्या मदत कार्यासाठी जात असताना हे हेलिकॉप्टर कोसळले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी या दुर्घटेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही या दुर्घटनेत लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य 5 जणांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे.