इस्लामाबाद – पाकिस्तानी सैन्याने चिनी बनावटीच्या व्हीटी-4 रणगाड्यांची पहिली बॅच आपल्या सैन्यात औपचारिकरित्या सामील करून घेतली आहे. चीनमधील सरकारी मालकीची रणगाडे निर्मिती कंपनी नोरिन्कोद्वारा या रणगाड्यांचा पाकिस्तानला पुरवठा मागील वर्षीच्या एप्रिल पासून सुरू करण्यात आला आहे.
चीनकडून व्हीटी-4 रणगाडे मिळवणारा पाकिस्तान तिसरा देश ठरला आहे. याआधी थायलंड आणि नायजेरियाने हे रणगाडे चीनकडून घेतले आहेत.
पाकिस्तानातील डॉन वृत्त पत्राने दिलेल्या वृत्तानुसार मंगला कौरचे कमांडर लेफ्टनंट जनरल शाहीन मजहर महमूद यांनी आर्मड डीव्हीजनचा दौरा करून व्हीटी-4 च्या बॅचची पाहणी केली.
मेजर जनरल राशिद महमूद यांनी म्हटलं की, रणगाड्यांची गतीशिलतेचं परिक्षण घेण्यात आलं. चीन आता संरक्षण क्षेत्रात पाकिस्तानचा भागीदारा झाला आहे. पाकिस्तान चीनकडून मागील अनेक दिवसांपासून शस्त्र खरेदी करत आहे.