निवृत्त होणार नाही – हफीझ

कराची – विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील साखळी गटातच पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हफीझ हा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त होणार नसल्याचे त्याने सांगितले.

पाकिस्तानचे माजी कर्णधार व प्रशिक्षक वकार युनुस यांनी हफीझला निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. हफीझने या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त होऊन नवोदित खेळाडूंसाठी जागा रिकामी करावी यासाठीही युनुस यांनी दबाब आणला आहे. तथापि आपण अद्याप त्याचा विचार केलेला नसून आणखी काही कालावधी क्रिकेटची सेवा करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.