#व्हिडीओ : ‘पाकिस्तान एअर स्ट्राईकचे पुरावे पाहिजेत तर या कोल्हापुरात’

कोल्हापूर – पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्याच्या विरोधात हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने कोल्हापुरातल्या शिवाजी चौकात अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे. सध्या देशात काही जण भारताने पाकिस्तान वर केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी कोल्हापुरी स्टाईलने हे आंदोलन आज करण्यात आलं. यामध्ये १५० किलो वजनाच ११ फूट उंच कोल्हापूर चप्पल हे खास आकर्षण होतं.

यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कोल्हापुरी चप्पल दाखवत निषेध नोंदवण्यात आला. या अनोख्या आंदोलनात पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचा जर कोण पुरवा मागत असेल तर त्यांनी कोल्हापुरातल्या शिवाजी चौकात केव्हाही यावं. त्यांना थेट कोल्हापूरी स्टाईलने अस्सल कोल्हापूरी चप्पलचा प्रसाद मिळेल, असा खणखणीत इशारा यावेळी हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)