पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन : एक जवान शहीद

नवी दिल्ली : जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने या निर्णयाचा निषेध पाककडून व्यक्‍त करण्यात येत आहे. त्यातच शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नौशेरा सेक्‍टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ रद्द केल्याने पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. हाच मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेवून जाऊन स्वत:चीच पाकने गोची करून घेतली आहे. चीनव्यतिरिक्‍त कोणत्याही देशाने काश्‍मीरप्रश्‍नावरून पाकला समर्थन दिले नाही. त्यात आता शनिवारी सकाळी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टरममध्ये भारतीय चौक्‍यांना पाककडून लक्ष्य करण्यात आले. पाकने गोळीबारासह उखळी तोफांचा मारा केला. सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला आहे. लान्स नाईक संदीप थापा असे जवानाचे नाव आहे. दरम्यान, पाककडून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला गोळीबार दुपारपर्यंत सुरूच होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×