पाकिस्तान : 62 वर्षीय खासदाराचा 14 वर्षीय मुलीशी विवाह

इस्लमाबाद – मुलींच्या शिक्षणासाठी तसेच बालविवाह रोखण्यासाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न होत असताना पाकिस्तानात मात्र एक विपरीत घटना घडली आहे. येथे एका 62 वर्षीय इसमाने चक्क 14 वर्षांच्या मुलीशी लग्न केले आहे. त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे हा इसम अन्य कोणी नसून ज्या संसदेत देशाचे कायदे बनवले जातात त्या संसदेचा सदस्य अर्थात खासदार आहे.

मौलाना सलाहउद्दीन अयाबी असे या महाशयांचे नाव असून ते बलूचिस्तानच्या चित्राल येथून पाकिस्तानच्या संसदेवर निवडून गेले आहेत. अर्थात आता या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

द डॉन या तेथील दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार मुलीच्या शाळेने तिचा दाखला माध्यमांना दाखवला असून त्यानुसार या मुलीचा जन्म 28 ऑक्‍टोबर 2006 रोजीचा आहे. एका स्वयंसेवी संस्थेने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली असून आता तपास केला जातो आहे.

दरम्यान, पोलीस या मुलीच्या घरी पोहोचल्यावर तिच्या पित्याने मात्र मुलीचे लग्न झाल्याच्या बातमीचा इन्कार केला आहे. आपण आपल्या मुलीला कुठेही पाठवणार नसल्याची हमी त्याने दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पाकिस्तानातील कायद्यानुसार 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीचे लग्न करणे हा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.