लाहोर – लाहोरमधील 10 हजार पोलिसांचे पथक आज माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या झमान पार्क या निवासस्थानामध्ये घुसले आणि त्यांनी घराची तपासणी करायला सुरुवात केली. इम्रान खान न्यायावलयात हजर होण्यासाठी इस्लामाबादेकडे रवाना झाल्यावर पोलीस घरामध्ये घुसले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या डझनभर कार्यकर्त्यांना अटक देखील केली आहे.
इम्रान खान यांच्या घराच्या प्रवेशद्वारासमोर उभे केलेले अडथळे पोलिसांनी हटवले. इम्रान खान यांना पोलिसांनी अटक करू नये म्हणून झमान पार्कच्या परिसरात “पीटीआय’च्या कार्यकर्त्यांनी जे तंबू ठोकले होते, ते देखील पोलिसांनी हटवले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये नेहमीप्रमाणे संघर्ष झाला. या संघर्षादरम्यान रिमान 10 कार्यकर्ते जखमी झाले आणि सुमारे 30 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
इम्रान खान यांच्या घरामध्ये घुसल्यानंतर पोलिसांनी “पीटीआय’च्या कार्यकर्त्यांना झोडपून काढायला सुरुवात केली होती, असे सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे. या घरामध्ये इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यादेखील उपस्थित असल्याचे मानले जात होते. झमान पार्कचा परिसर रिकामा करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली असल्याचे पंजाब प्रांताच्या काळजीवाहू सरकारचे माहिती मंत्री आमिर मीर यांनी सांगितले.
झमान पार्कच्या परिसरामध्ये बंदी असलेल्या संघटनांचे कार्यकर्तेही असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांना हा परिसर रिकामा करण्याची अनुमती देण्यात आली होती. ऍन्टी टेरेरिझम डिपार्टमेंटने झमान पार्कच्या तपासणीसाठी”सर्च वॉरंट’ बाजावले आहे. या कारवाईदरम्यान 3 पोलीस आणि “पीटीआय’चे 6 कार्यकर्तेही जखमी झाल्याचे मीर यांनी सांगितले.
इम्रान खान यांच्यावाहनाच्या ताफ्यातील एक कार उलटली
न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी इम्रान खान इस्लामाबादेकडे रवाना होत असताना त्यांच्या वाहनातील एक कार उलटली. तोषखान प्रकरणी शनिवारी इम्रान खान न्यायालयात उपस्थित राहमार असल्याचे आगोदर स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे पाक सरकारने या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयातून इम्रान खान यांच्या सुरक्षिततेसाठी इस्लामाबादेतील ज्यडिशियल कॉम्प्लेक्समध्ये हलवली. आज सकाळी इम्रान खान तेथे जाण्यासाठी रवाना झाले. वाटेतच त्यांच्या ताफ्यातील एक काल उलटली. मात्र या कारमध्ये इम्रान खान नव्हते. अन्य कोणी जकमी झाल्याचे वृत्त नाही.