ENG vs PAK 2nd Test Day 1 (Kamran Ghulam debut century) : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मुलतानमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानने 5 गडी गमावून 290 धावा केल्या आहेत. या सामन्यात पाकिस्तानचा युवा फलंदाज कामरान गुलामने शानदार शतक झळकावले आहे. यादरम्यान त्याने एक मोठा विक्रम मोडला आहे.
कामरान गुलामने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. बाबर आझमच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये केवळ चार फलंदाज असे आहेत ज्यांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पदार्पणाची संधी मिळाली आहे.
Special moment for Kamran Ghulam! 🌟
He brings up a stellar 💯 on debut with his family watching 🙌#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/Y1hrau9D7w
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 15, 2024
चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने शानदार शतक झळकावले आहे. यासह तो सलीम मलिकनंतरचा दुसरा पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे. ज्याने चौथ्या क्रमांकावर पदार्पण करताना शतक झळकावले आहे. त्याने 224 चेंडूत 118 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. सलीम मलिकने 1982 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. यावेळी त्याने पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले होते.
Bangladesh Cricket : चंडिका हथुरुसिंघांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी, समोर आलं ‘हे’ कारण….
अशी कामगिरी करणारा ठरला 13वा पाकिस्तानी फलंदाज…
कामरान मलिकने कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. यासह पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो 13वा पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे. त्यांच्या आधी खालिद अब्दुल्ला, जावेद मियांदाद, सलीम मलिक, मोहम्मद वसीम, अझहर महमूद, अली नक्वी, युनूस खान, तौफिक उमर, यासिर हमीद, फवाद आलम, उमर अकमल आणि आबिद अली यांनी ही कामगिरी केली होती.