#CWC19 : पाकिस्तानचे द.आफ्रिकेसमोर 309 धावांचे लक्ष्य

लंडन – हॅरिस सोहेल आणि बाबर आझम यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावार पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 309 धावांचे आव्हान ठेवले आहे. यामध्ये हॅरिस सोहेल याच्या 59 चेंडूत (9 चौकार आणि 3 षटकार) 89 धावांची खेळी ही पाकिस्तानच्या डावाची वैशिष्ट्य ठरलं.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फंलदाजी घेत 50 षटकांत 7 बाद 308 धावा केल्या. पाकिस्तानकडून फलंदाजीमध्ये हॅरिस सोहेल याशिवाय बाबर आझमने 69 तर इमाम-उल-हक आणि फखर जमान यांनी प्रत्येकी 44 धावा केल्या.

आफ्रिकेकडून गोलंदाजीत लुंगी एनगिडी याने 9 षटकांत 64 धावा देत 3 विकेटस तर इमरान ताहिरने 10 षटकांत 41 धावा देत 2 विकेटस घेतल्या. एन्डिले फेहलुकवेओ आणि एडेन मारक्रम यांनी प्रत्येकी 1 विकेट पटकावली.

Leave A Reply

Your email address will not be published.