संयुक्‍त राष्ट्राच्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी पाककडून मार्गदर्शक सूचना जारी

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आणि दहशतवादी व्यक्‍तींवरील कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढतो आहे. त्याचदरम्यान पाकिस्तानने संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या नियम 1267 च्या अंमलबजावणीसाठीची मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. संयुक्त राष्ट्राने “1267 या नियमांनुसार’ लक्ष्य केलेले लोक आणि गटांविरुद्ध आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास मार्गदर्शक तत्त्वे मदत करतील, असे परराष्ट्र कार्यालयाने सांगितले.

विदेश सचिव तेहमिना जान्जुआ यांनी याबाबतची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनांची पाकिस्तानला जाणीव असायलाच पाहिजे. संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांच्या अंमलबजावणीबाबतही ही जाणीव पाकिस्तानला असायलाच पाहिजे, असे जान्जुआ यांनी सांगितले. या मार्गदर्शक सूचनांमुळे सर्व संबंधितांना निर्बंधांच्या परिणामकारक अंमलबजावणीशी संबंधित आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात मदतच मिळणार आहे, असेही जान्जुआ म्हणाल्या.
संयुक्‍त राष्ट्राच्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी नियुक्‍त केलेल्या एका राष्ट्रीय कमिटीने या मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय निकषांना अनुसरून विविध संबंधितांशी चर्चाही करण्यात आली होती. पुलवमा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दहशातवाद्यांविरोधातील कारवाईसाठी मोठा दबाव येऊ लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.